March 25, 2026


वाळूजमहानगर, (ता.18) – शेतीच्या जुन्या वादावरून कोर्टकचेरी सुरू असताना ताबा मिळवण्याच्या कारणावरून दोन समाजाच्या शेतकऱ्यांमध्ये वाद होऊन जीवे मारण्याची धमकी देत शेतातील पत्राच्या शेडची तोडफोड करण्यात आली. यावेळी संतप्त जमाव जमल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. अंबेलोहोळ येथे हा प्रकार रविवारी (ता.17) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आंबेलोहोळ येथील सय्यद हाजी सय्यद अली व राजुरा येथील कडु सुदामा दाभाडे यांच्यात
आंबेलोहळ शेत गट नं 359 मध्ये शेत जमीनी संबधीची जुन्या वादाची कोर्ट तारीख जवळ आल्याने आरोपी कडू दाभाडे याने सय्यद अलीच्या शेतात ताबा मिळवण्याच्या उद्देशाने अनोळखी महिला शेतात बसवल्या. त्यांना सय्यद अलीने आडवण्याचा प्रयत्न केला म्हणुन अनोळखी महिलांनी संगणमत करुन सय्यद अलीला हाताचापटाने मारहाण करुन शिवीगाळ केली. व त्याच्या शेतातील पत्र्याचे शेडची तोडफोड केली. रविवारी (ता.17) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती 112 ला मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी पोलिसांनी दोघांनाही समजावून सांगत न्यायालयात दाद मागण्याची समज दिली. दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलीस अंमलदार किशोर गाडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी सय्यद हाजी सय्यद अली (60) रा. अंबेलोहळ या शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून आरोपी कडु सुदामा दाभाडे (60) व लक्ष्मी बाबासाहेब काळे (50) रा. राजुरा व इतर अनोळखी महिला यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 323, 504, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाळूज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहे.
सिलिंग मधील जमीन –
आंबेलोहळ शेत गट नं 359 मध्ये 10 एकर शेती आहे. त्यातील 2 एकर शेती सिलिंगमध्ये गेलेली आहे. या जमिनीचा वाद कोर्टात सुरू आहे. त्याची तारीख जवळ आली असताना ताबा मिळवण्यासाठी काही महिला आणून बसवल्याने हा वाद झाला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *