वाळूजमहानगर, (ता.1)- तलवार हातात घेऊन फिरून दहशत निर्माण करणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील दोन हजार रुपये किमतीची धारदार तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई कमळापूर येथे रविवारी (ता.30) रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनिल बबन राऊत रा. हरसिद्धी लॉन्सच्या पाठीमागे, जयराज पार्क, कमळापुर हा सैलानी बाबा दर्ग्यासमोर कमळापूर येथे तलवार हातात घेऊन फिरवत दहशत निर्माण करत असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोउपनि संदिप काळे यांनी घटनास्थळी धाव घेत अनिल राऊत याला पकडले. त्याच्या ताब्यातून 2 हजार रुपये किमतीची दुधारी स्टीलचे पाते असलेली तलवार जप्त केली.

