March 28, 2026

 

वाळूज महानगर, (ता.14) : – नंगी तलवार घेऊन दहशत निर्माण करत शेजारच्या घरात घुसल्याने काहीजणांनी दगडफेक करून घराचे व आतील सामानाचे तोडफोड करून नुकसान केले. या घटनेत दोघांना दगड व काठीने मारहाण करण्यात आली. यात एक जण जखमी झाला. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचे नुकसान करणारी ही घटना रविवारी (ता.12) रोजी रात्री सिनेस्टाईल रित्या वाळूज येथील म्हसोबानगरात घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुलवेश्वर आनंदराव कोळपकर वय 27 व आप्पासाहेब गायके वय 28 हे वाळुज जवळील म्हसोबानगर, नायगाव- बकवालनगर येथे राहतात. रविवारी (ता.12) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास गुलेश्वर कोळकर हे दुचाकीसह येत असताना काही जणांनी त्यास आमच्या अंगावर लाईट का मारला असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाल्याने कोळपकर हा घरी आला. त्याच्या पाठोपाठ इतर सात ते आठ जण आले. आणि कोळपकर यास शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोळपकर याने घरातील तलवार काढून दहशत निर्माण केली. या घटनेनंतर त्याच्यावर दगडफेक झाली. त्यामुळे घाबरलेला कोळपकर हा नंगी तलवार घेऊन जवळच्याच राहुल गायके यांच्या घरात घुसला. त्यामुळे आठ ते दहा जणांनी राहुल गायके यांच्या घरावर दगडफेक करून घरात घुसून तोडफोड करत घराचे व आतील सामानाचे नुकसान केले. यावेळी गायके यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत दगड व काठीने राहुल गायके व आप्पासाहेब गायके यांना मारहाण केली. यात राहुल गायके हा जखमी झाला दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले, पोलीस अंमलदार बजरंग धाडगे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी गुलवेश्वर कोपळकर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार जप्त केली. या प्रकरणी गुलवेश्वर कोळपकर याच्याविरुद्ध तलवार बाळगणे व दहशत निर्माण केल्याप्रकरणी तसेच कपिल जाधव, अमोल घुले व अन्य 6 अनोळखींविरुद्ध गैर कायद्याची मंडळी जमा करून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सय्यद हनीफ व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील म्हस्के हे करीत आहे.
दोघांचे भांडण तिसऱ्याचे नुकसान

गुलवेश्वर कोळपकर याचे कपिल जाधव, अमोल घुले व अन्य सहा अनोळखी यांच्यात शुल्लक कारणावरून भांडण झाले. त्यानंतर कोळपकर याने तलवार काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. व राहुल गायके यांच्या घरात घुसला. त्यानंतर जाधव, घुले व इतरांनी राहुल गायके यांच्या घरावर दगडफेक करून घरात घुसून तोडफोड करत घराचे व आतील सामानाचे नुकसान केले. तसेच जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *