March 23, 2026


वाळुज महानगर, (ता. 5) – बजाजनगर येथील तणवाणी महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

विज्ञान शाखेतून राज कैलास आवारे याने 95. 50% व वाणिज्य शाखेतून अनुराधा सोनवणे हिने 96.33 टक्के गुण घेऊन वाळूज महानगरातून सर्वप्रथम येण्याचा मान पटकविला. तसेच पायल काकडे हिने 95% गुण प्राप्त करून द्वितीय तर जानवी वसमतकर व वैष्णवी दहीभाते या दोघींनीही 94% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच विज्ञान शाखेतून शुभम राशिनकर याने 81. 17 टक्के घेऊन द्वितीय तर श्रुती गरड हिने 80% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून गौरी राजपूत, श्रुती काळे, पायल काकडे या विद्यार्थिनींनी अकाउंट या विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहे. वाळुज महानगरातून सर्वोत्कृष्ट निकाल हा महाविद्यालयाच्या दोन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी दिला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, सचिव पंडित नवले, कोषाध्यक्ष विजय उखळे, संचालक राजेंद्र माने, अशोक लगड, प्राचार्या अर्चना जाधव, पर्यवेक्षिका ज्योत्स्ना निलावाड व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजपूत चंदन यांनी केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *