
वाळूजमहानगर, (ता.11) – कमलापूर येथील जय भवानीनगर या नागरी वसाहतीत ड्रेनेजलाईन नसल्यामुळे नागरिकांसह महिलांची मोठी कुचंबना होत आहे. त्यामुळे येथील महिला व नागरिकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ड्रेनेज लाईन तात्काळ करून देण्याची मागणी रविवारी (ता.10) रोजी केली.

वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे परिसरात निवारा म्हणून कामगार अल्प दरात भूखंड खरेदी करतात. मात्र तेथे अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी नागरिक ग्रामपंचायतकडे धाव घेतात. जयभवानीनगर, कमळापुर येथे ड्रेनेज लाईनचे काम झालेले नसून त्याठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ करून देण्यात यावे. अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
आठवडाभरात काम सुरू होणार –
या मागणीची दखल घेत सरपंच रमेश आरगडे,
माजी सरपंच अमोल लोहकरे, गजानन बोंबले यांनी रविवारी (ता.10) रोजी प्रत्यक्ष पाहणी करून येत्या आठवड्याभरात ड्रेनेजलाईनचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी किशोर लोहकरे, मनोहर लोहकरे, नागराज पाटील, राजेंद्र गोरे, कृष्णा नायबळ, दशरथ कांबळे, राजू लोमटे, अण्णासाहेब वाघ, वाल्मिक सोमासे, सुरेश हरणे, ज्ञानेश्वर वरपे, मच्छिंद्र काटे, ईश्वर तुपे, आरती तुपे, अनिता बनरावत, अर्चना वरपे, रूपाली ताठे, सविता हरणे, मनीषा सोमासे, शशिकला सुरासे, भाग्यश्री वाघ, ज्योती पुंडके, दीक्षा वाकळे, दीक्षा पाईकराव, हकीमा पठाण, मिनाज पठाण, कल्पना गुट्टे, रुपाली तुपे आदी उपस्थित होते.
