
वाळूजमहानगर, (ता.13) – लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालय रांजणगाव पोळ व डोणगाव येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

वसू सायगाव येथे शनिवार 10 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेमध्ये लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालय रांजणगाव (पोळ) च्या दिनेश प्रकाश मोरे 17 वर्ष वयोगटात 400 मीटर व 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवला.
तर प्रिया भैरवलाल चौधरी हीने 400 मीटर शर्यतीत दुतीय क्रमांक पटकावला. तसेच 14 वर्षे वयोगटात तनुजा शिवाजी रोकडेने 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत दुतीय क्रमांक पटकावला. तसेच डोणगाव येथील विद्यार्थी रामनाथ रामकिसन काळे याने 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावत शाळेचे नाव उज्वल केले.
या निवडीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा इंदुमती डोणगावकर, सचिव देवयानी डोणगावकर, मार्गदर्शक कृष्णा पाटील डोणगावकर, मुख्याध्यापक सुधाकर थोरात, क्रीडा शिक्षक शिवाजी महाजन, डोणगाव शाळेचे मुख्याध्यापक गोविंद हिवाळे, प्रशासकीय अधिकारी संतोष मल्लनाथ, शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बोडखे तसेच दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
