February 5, 2026


वाळुज महानगर – डॉ.होमीभाभा यंग सायंटिस्ट परीक्षेत वाळूज येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मधील ऑर्किड टेक्नो स्कूल व ऑर्किड इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले.


डॉ. होमी भाभा यंग सायंटिस्ट अवॉर्ड परीक्षा नुकतीच घेण्यात आली. या परीक्षेत वाळूज येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मधील ऑर्किड टेक्नो स्कूल व ऑर्किड इंग्लिश स्कूलच्या 6 वी व 9 वीच्या 302 विद्यार्थी मधून 120 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 19 विद्यार्थी प्रॅक्टिकल राऊंड ला कॉलिफाइड झाले आहेत. त्यामध्ये वर्ग 6 वी मधून अवनी डबीर, देवश्री कोतकर, सार्थक सोमवंशी, समृद्धी ढोकणे, समीक्षा सांगडे, इशिता विसपुते हे विद्यार्थी तर वर्ग 9 वी तील सर्वेश कदम, ओजस पोटे, श्रीवर्धन जेधे, अर्चीत कोथावडे, सोनिका सिंगम्पल्ली, समृद्धी वानखेडे, सुहास जाधव, सोहम थोरात, अर्नव जाधव, समर्थ मोगरे, ओजस धुळे, शुभम जाधव, अविराज संकपाळ या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच इयत्ता 6 वी मधून 48 विद्यार्थी व इयत्ता 9 वी मधून 72 असे एकूण 120 विद्यार्थी प्रमाणपत्रास प्राप्त झाले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व शिक्षकांनी तसेच पालक यांनी स्वागत करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *