March 19, 2026


वाळूजमहानगर, (ता.16) – ठकवणुक करण्याच्या उद्देशाने बनावट व खोटा क्रमांक टाकुन व बेईमानी करून तो खरा आहे. असे भासवून कंटेनर चालवून शासनाची फसवणुक करणाऱ्या आरोपीला जेरबंद करून त्याच्या ताब्यातील कंटेनर जप्त करण्यात आले. ही कारवाई मंगळवारी (ता.14) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास वाळुज औद्योगिक वसाहतीत करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुडएअर चौक, रांजणगाव (शे. पु.) येथे एक इसम टाटा कंपनीचा बनावट क्रमांक (एन एल 01, ए एफ-4020) असलेला कंटेनरसह उभा आहे. अशी बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी तेथे धाव घेतली असता येथे एक इसम टाटा कंपनीचा कंटेनरसह मिळुन आला. त्यास त्याचे नाव पत्ता बाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव उध्दव सोमीनाथ सानप वय 21 वर्षे व्यवसाय चालक रा. पिपरगव्हाण ता. जि. बीड असे सांगितले. कंटेनर क्रमांकाबाबत व मुळ कागदपत्राबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे संशय आल्याने कंटेनरच्या मुळ क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणले. ट्रॅफीकचे किशोर सोमासे यांच्या मदतीने चौकशी केली असता कंटेनरचा चेसीस व इंजिन क्रमांक वेगवेगळा असल्याचे समजुन आले. त्यामुळे उध्दव सानप याला कंटेनरच्या मुळ क्रमांकाबाबत विचारपुस केली असता त्याने वाहनाचा मुळ क्रमांक सांगुन हे कंटेनर दोन महिन्यापुर्वी राहुल भानुदास अल्हाटकडुन विकत घेतले असुन बनावट क्रमांक टाकुन चालवित असल्याचे सांगितले. या प्रकरणी रोहीत ईश्वरसिंग चिंधाळे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 420, 465 भारतीय दंड विधान प्रमाणे वाळूज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *