
वाळुज महानगर, (ता.8) – राष्ट्रीय ट्रान्सपोर्ट दिवस दरवर्षी 6 सप्टेंबर रोजी सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्त सोमवारी 8 सप्टेंबर मसीआ हॉल मोरे चौक येथे वाहतूकदार स्नेहसंमेलन उत्साहात झाले. यावेळी विश्वगती मोटर चालक-मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे वाहतूक क्षेत्रात सुविधा पुरवणाऱ्या ट्रान्सपोर्ट चालकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रदीप माळी यांनी व्यसनमुक्ती विषयी तसेच एच एस आर पी एस सबंधी जनजागृती विषयक मार्गदर्शन केले.

प्रथम शारदा प्रसाद मिश्रा मार्गदर्शन करताना म्हणाले की, नंबर प्लेट बदलून घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती कमी पडते. त्यामुळे संघटनेने प्रशासनाला मदत करावी, यावेळी व्यसनमुक्ती विषयी प्रदीप माळी यांनी सांगितले की, वाहतूकदारांचे व्यसन मुक्तीसाठी संघटनेसोबत वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम घेऊन वाहतूकदार व्यसनमुक्त असा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विश्व गती मोटर चालक-मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय काकडे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, वाहतूक क्षेत्राचे झालेल्या गैरसोयी व असंघटित राहण्याचे परिणाम आज भोगावे लागत आहे. तरी सर्वांनी संघटित होऊन काम करण्याची गरज आहे. संघटनेचे प्रदेश सचिव गोकुळ तुपे यांनी बोलताना सांगितले की, वाहतूकदारांची पार्किंगसाठी होणारी तारांबळ बघता वाहतूकदारांनी पार्किंग समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या उद्योगनगरीत वाहतूकदारांना स्थान नाही. ट्रान्सपोर्टरना लॉजिस्टिक हब नाही. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे प्रशासनांना लक्ष घालण्यास भाग पाडण्याचे काम विश्व गती मोटर चालक-मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मसीआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड, विश्वगती मोटर चालक-मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय काकडे, प्रदेश सचिव गोकुळ तुपे, जिल्हाध्यक्ष मुकेश मंगरूळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रम प्रसंगी वाहतूकदार (ट्रान्सपोर्टर) महेंद्र शर्मा, दलवीर पुनिया, शिरीष अन्सारवाडीकर, सुरेंद्र डेक, छत्तर जैन, युवराज मोगल, रामेश्वर चौधरी, अविनाश वाठोरे, पिंटू घाईट, गणेश आंबडे, जे एस मित्तल, जयसिंग वर्मा, भीमराव दहिफळे, अनिल शर्मा, निलेश घुले, गणेश महामुनी यांच्यासह शेकडो वाहनधारक, चालक व ट्रान्सपोर्टर उपस्थित होते.
