March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.1) – वाळूज औद्योगिक क्षेत्रातील जी सेक्टर मधील जे के कंपनीच्या समोरील रोडवर झालेल्या वाहन दुर्घटनेत एक कामगार मृत्यू मुखी पडला. ही दुर्घटना शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात रेणुकादास रामेश्वर मोरे या दुचाकीस्वार कामगाराचा मृत्यू झाला आहे. हा कामगार दुचाकी (एम एच 20, एच ई – 1937) वरून कंपनीत ये जा करत होता. शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एका अज्ञात आयशर ट्रकने रेणुकादास मोरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली व घटनास्थळावरून आरोपी ट्रक चालक ट्रकसह फरार झाला. याप्रकरणी एम आय डी सी वाळूज पोलिस ठाण्यात मयत कामगाराच्या भावाच्या फिर्यादीवरून आरोपी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *