March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.27) – भरधाव जाणारी दुचाकी व रस्त्यात उभा असलेला  ट्रक यांच्यात जोराची धडक होऊन दुचाकी वरील 27 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवर ईसारवाडी फाटा येथे बुधवारी 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:10 वाजेच्या सुमारास झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुचाकी (एम एच 20, जी वाय -8255) स्वार पवन दत्तू माळी (वय 27) रा. महालगाव ता. वैजापूर

हे बुधवारी 27 ऑगस्ट रोजी मूर्मी येथून महालगावला जात असताना ईसारवाडी फाटा येथे सायंकाळी 7:10 वाजेच्या सुमारास ट्रकला मागून धडकल्याने गंभीर जखमी झाले.

त्यांना ईसारवाडी फाट्यावर 24 तास सेवेत असणारी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नानिजधाम यांची विनामूल्य रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्ताला उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *