-
पंढरपूरकडून वाळूजकडे येणाऱ्या ट्रकने समोरील दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (ता.12) रोजी दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास वाळूज महामार्गावरील बजाज मटेरियल गेट समोर झाला.
समता कॉलनी, शिवाजीनगर परिसर वाळूज येथील विशाल शिंदे व लोभाजी घुंगरराव हे दोघे बुधवारी (ता.12) रोजी दुचाकी (एम एच 20, सीएक्स -6649) वरून पंढरपूरकडून वाळूज येथे घरी येत होते. त्यांच्या पाठीमागे ट्रक (एम एच 20, ए टी- 5448) येत होता. या ट्रकनेला जोराची धडक दिल्याने आलेल्या अपघातात विशाल शिंदे हा गंभीर जखमी झाला. तर त्याचा साथीदार लोभाजी घुंगरराव हा किरकोळ जखमी झाला. बुधवारी (ता.12) रोजी ददुपारी 3.45 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात जखमी रस्त्यावरच पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. याच दरम्यान ट्रक चालक आरोपीने अपघातस्थळी ट्रक सोडून फरार झाला. दरम्यान ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी जखमी शिंदे व घुंगरराव यांना खाजगी रुग्णवाहिकेने उपचारार्थ दाखल केले.
