March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.23) – भरधाव जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीस वर्षीय दुचाकीस्वार कामगार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. हा अपघात वाळूज औद्योगिक वसाहतीतील एम सेक्टर मध्ये शुक्रवारी (ता.22) रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
छत्रपतीनगर, राजणगांव (शे.पु.) येथील अक्षय प्रल्हाद कांबळे (वय 30) हा कामगार शुक्रवारी (ता.22) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास टी.व्ही.एस.स्टार दुचाकी (एम एच 20, जी 1-0669) वर घरी येत असतांना टेम्पो (एम एच 04, इ बी -9204) च्या अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवुन अक्षय याच्या दुचाकीला समोरून जोराची धडक देवून गंभीर जखमी केले. वाळुज औद्योगिक वसाहतीतील एम सेक्टर मधील अण्णा भाऊसाठे चौक, या ठिकाणी झालेल्या या अपघातात अक्षय कांबळे हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. या प्रकरणी विजय प्रल्हाद कांबळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात टेम्पो चालका विरुद्ध कलम 279,304 (अ), 337, 338 भादंविप्रमाणे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहे. दरम्यान वाळुज एमआयडीसी पोलिसांनी आरोपी टेम्पो चालक मनसाराम मंगलसिंग परदेशी यास ताब्यात घेतले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *