March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.12 – दर्शनासाठी येणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोर व नशा पाणी करणाऱ्या मुलांना 63 वर्षीय वृद्ध इसमाने जाब विचारला असता त्यांनी फायटरने तसेच हाताचापटाने मारहाण मारहाण करून जखमी केले. ही घटना बजाजनगर येथील गणपती मंदिराच्या आवारात शनिवारी (ता. 11) रोजी सांयकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश मुरलीधर नवले (वय 63) रा. आर एक्स -16 स्वेदशिल्प हौ. सो. त्रिमुर्ती चौक, बजाजनगर हे शनिवारी (ता. 11) रोजी सांयकाळी 6.30 वाजेच्या सुमारास गणपती मंदिराच्या आवारात असताना तेथे काही मुली दर्शनकरीता आल्या होत्या. त्या बाथरुमकडे जात असताना ऋषभ बावस्कर, विशाल झगडे रा. बजाजनगर -वडगाव (कोल्हाटी)हे तेथे आले. त्यामुळे तुम्ही येथे विनाकारण मुले जमवुन, नशाबाजी करुन मुलींची छेड काढता असे प्रकाश नवले त्यांना म्हणाले असता त्यांनी नवले यांना शिवीगाळ केली. म्हणून त्यांना समजवत असताना ऋषभ बावस्कर (वय 19) याने त्याचे खिशातील लोखंडी फायटर काढुन नवले यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच विशाल झगडे याने हाताचापटाने मारहाण करुन तु म्हताऱ्या नेहमी आम्हाला बोलतो. असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पांडुरंग जुंदरे, प्रविण काळे यांनी पाहिला. त्यामुळे त्यांनी मारहाण करणाऱ्यांना हुसकावुन लावले. सुमारे एक वर्षापासुन भागात ही मुले मुलींची छेड काढीत असल्याने प्रकाश नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी ऋषभ बावस्कर, विशाल झगडे यांच्या विरुद्ध कलम 118 (1).115 (2), 352, 351 (3), 3 (5) बी एन एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *