March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.13) – मारोती मंदिर जोगेश्वरी येथे ह. भ. प. संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन मंगळवारी (ता.19) करण्यात आले.

याप्रसंगी ह.भ.प. शिवाजी महाराज काळे, नांदेडा यांनी उपस्थित ग्रामस्थ व समाज बांधवांना संत सेना महाराज यांनी केलेले सांप्रदायिक कार्य याचे महत्व कीर्तनाच्या माध्यमातून समजावून सांगितले. संतांच्या विचारावर चालल्यास निश्चित सुखाची प्राप्ती होईल. असे त्यांनी कीर्तनातून प्रबोधन केले. जोगेश्वरीतील भजनी मंडळाने महाराजांना सुरेख साथ दिली.

यावेळी माजी सरपंच प्रवीण दुबिले, अमोल लोहकरे, गजानन बोंबले, सूर्यभान काजळे, गणेश साबळे, संदीप दुबिले, बिक्कन घोडके, सह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्तित होते.

‘कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण बनकर, कैलास सोनावणे, अमोल वर्पे, संतोष तोडकर, गजानन वर्पे, सिद्धेश्वर गायकवाड, चेतन हातकांगाने, सुनील कांबळे, ज्ञानेश्वर बोराडे, तानाजी सुरासे, सुरेश शेजूळ, अविनाश बनकर, आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *