
वाळूजमहानगर, (ता.26) – कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी एका 14 वर्षीय मुलीचेअपहरण केल्याची घटना बुधवारी (ता.24) रोजी वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जोगेश्वरी न्यु़ आंबेडकरनगर येथील 14 वर्षीय मुलगी बुधवारी (ता.24) रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली. तिचा आजूबाजूला नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
