वाळूजमहानगर, (ता.10) – घरी जाणाऱ्या एका 33 वर्षीय वर्षीय कामगारास रस्त्यात अडवून तीन जणांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करून जखमी केले.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडगाव कोल्हाटी येथील राहुल राठोड (33) हा 13 फेबुवारी रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास कंपनीत कामासाठी जात होता. त्याला एनआरबी कंपनीच्या जवळ चेतन्य पानपट्टे, वैभव पठारे व अन्य एकजण यांनी अडवले. त्यानंतर जुण्या भांडण्याच्या कारणावरून लाथबुक्यानी व लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केली. संतोष भागवत यांनी त्यास उपचारार्थ बजाजनगर येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातून सुट्टी होताच या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तीघा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
