
वाळुज महानगर, (ता.2) – वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीकठाण फाटा येथे दोन ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा अपघात मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास झाला.
जखमींना इसारवाडी पॉईंटवर असणारी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणिजधामच्या रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना उपचारार्थ दाखल केले.
प्राथमिक दृष्ट्या या अपघातात दोन जण जखमी झाल्याचा अंदाज आहे मात्र अपघाताची भीषणता मोठी असल्याने या अपघाताची सविस्तर माहिती थोड्याच वेळात देण्यात येईल.
