
वाळुज महानगर, (ता.24) – महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी दर्जा मिलावा. यासाठी काम बंद आंदोलनाची हाक देत जिल्हाधिकारी यांना महसूल सेवक संघटना छत्रपती संभाजीनगरच्या वतीने बुधवारी 24 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

महसूल विभागाचा कणा समजला जाणारा महसूल सेवक (कोतवाल) यांना अद्यापपर्यत चतुर्थ श्रेणी दर्जा मिळाला नाही. विविध विभागात कंत्राटी म्हूणन घेतलेल्यांना शासनाने शासन सेवेत रुजू करून घेतले. परंतु महसूल सेवक यांना श्रेणी पासून आजपर्यत वंचित ठेवले. यासाठी विदर्भ महसूल सेवक कोतवाल संघटना बेमुत काम बंद, धरणे, साखळी उपोषण करत आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रतुन महसूल सेवकांकनी पाठींबा दिला आहे. या अनुषंगाने बुधवारी 24 सप्टेंबर पासून छत्रपती संभाजीनगर जिल्हा सर्व महसूल सेवक बेमुदत काम बंद आंदोलतात सहभागी होत आहे. याविषयीचे निवेदन महसूल सेवक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना बुधवारी 24 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष नागेश बारसमवार, जिल्हा सचिव अण्णा जाधव, संतोष कुंजरे गंगापूर तालुका अध्यक्ष, अमोल खैरनार गंगापूर तालुका सचिव, शेख सिराज गंगापूर उपाध्यक्ष, गणेश गवते कार्याध्यक्ष गंगापूर, निलेश अनभूले छत्रपती संभाजीनगर तालुका अध्यक्ष, रवी भगत छत्रपती संभाजीनगर तालुका सचिव, दिलीप पाटील, अनिल घोरपडे अध्यक्ष खुलताबाद, बाबासाहेब जगताप वैजापूर, शिवाजी गायकवाड पैठण, महिला प्रतिनिधी योगेश्वरी राठोड, वैशाली इंगळे सविता सागरे, उषा काथार, राजश्री रासने व इतर सर्व महसूल पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
