April 11, 2026

वाळुजमहानगर, (ता.10) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पंढरपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुक्रवारी 10 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हापरिषद सदस्य विद्या रमेश गायकवाड यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे महत्त्व समजावून सांगत शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थित माजी जिल्हापरिषद सदस्य रमेश दादा गायकवाड, साहेबराव दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य आमीर पठाण, आयोजक गणेश जाधव, डॅनी जगताप, रुबिना बाजी, दिलीप उबाळे, केरुबाळ सुखधान, झळके तात्या, सागर कानडे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *