वाळूज महानगर (ता.26) – गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बजाजनगर येथे भाजपचे वर्चस्व दिसून आले. येथील मतदार भाजपच्या पाठीमागे आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत भाजपाच झेंडा फडकावणार असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय खंबायते यांनी बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी व्यक्त केले. बजाजनगर-लक्ष्मीनगर येथे जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित दिवाळीमिलन व स्नेह भोजन कार्यक्रमात ते पत्रकारांशीबोलत होते.
युतीसंदर्भात वरिष्ठ निर्णय घेणार –
बजाजनगर येथे गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणूक शिवसेनेने सर्वाधिक जागा पटकावत भाजपला धक्का दिला. त्यामुळे बजाजनगर येथे शिवसेना भाजपचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. म्हणून येत्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होईल का? यावर प्रश्न विचारले असता खंबायते म्हणाले की, निवडणुकांची तारीख निश्चित झाली नसून, युतीच्या निर्णयाबाबत पक्षाच्या बैठकीत भुमिका मांडणार आहे. भाजपा एक नंबरचा पक्ष आहे. यासाठी निवडणूकीची तयारी सुरू झाली आहे. भाजप हा सर्व सामान्यांचा विचार करणारा पक्ष आहे. पक्षाने राबवलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोच करण्याचे काम आम्ही करतो.आम्ही विरोधी उमेदवाराचा नव्हे तर जनतेचा विचार करतो. युतीबाबत आगामी निवडणुकीत स्थानिक पातळीवर योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे खंबायते म्हणाले.
या कार्यक्रमाला जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनवणे, उपाध्यक्षा अंजली देशमुख, यांच्यासह बजाजनगर येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न देशमुख, सुनील राठी, गणेश कोलते, आशिष पावडे, विजय सरकटे, नरेंद्रसिंग यादव, आशिष धुमाळ, अमोल काळे, नंदा राजपूत, सुनंदा जाधव, पंकज कुलकर्णी, प्रकाश निकम, तुषार जाधव, एकनाथ मस्के, अनिल वाढेकर, कृष्णा नागे, अक्षय शिंदे, नवनाथ मनाळ आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
