
वाळूजमहानगर, (ता.10) – दुचाकीवर जाणाऱ्या 31 वर्षीय तरुणास चक्कर आल्याने तो दुचाकीवरून खाली पडून गंभीर जखमी झाला. छत्रपती संभाजीनगर ते नगर हायवेवर जिकठाण फाट्याजवळ शनिवारी (ता.10) दुपारी 4 वाजता झालेल्या या अपघातातील जखमी दुचाकीस्वाराला नाणीजधाम रुग्णवाहिकेने उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लिंबे जळगांववरून टेंभापुरीकडे जाण्यासाठी निघालेला दुचाकी (एम एच 20, डी एन – 3392) स्वार देविदास मुरलीधर खवले वय 31 वर्ष रा. टेंभापुरी हा प्रवास सुरू असताना चक्कर येऊन रोडच्या खाली जाऊन पडला. छत्रपती संभाजीनगर ते नगर हायवेवर जिकठाण फाट्याजवळ शनिवारी (ता.10) दुपारी 4 वाजता झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच जवळच असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांची विनामूल्य ॲम्बुलन्सने त्वरित अपघातस्थळी धाव होऊन अपघातग्रस्ताला वाळूज हॉस्पिटल पंढरपूर येथे दाखल केले.
