February 5, 2026

वाळूज महानगर – जिकठाण येथे गुरुवार 29 डिसेंबर पासून सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहची सांगता गुरुवर्य भास्करगिरी महाराज (देवगड संस्थान) यांचे उत्तराधिकारी प.पू. स्वामी महंत स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोमवारी 5 जानेवारी रोजी उत्साही आणि धार्मिक वातावरणात झाली.


प्रथम जिकठाण गावात ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी भाविकांनी टाळ मृदंगाच्या तालावर अभंग गायले. यावेळी महिला भाविकांनी पावली व फुगडी खेळून आनंद लुटला. त्यानंतर प.पू. प्रकाशनंद गिरी महाराज यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग सादर करताना गोपाळ कलाचे महत्त्व स्पष्ट केले.

यावेळी प.पू.धर्माचार्य डॉ.जनार्दन महाराज मेटे, प.पू.प्रेमदास महाराज (मुर्मी) यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच ज्ञानेश्वर खोमणे, माजी सरपंच कैलास खोमणे, प.पू. तुकाराम महाराज वाळके, प.पू.कैलास महाराज खोमणे, कृष्णा महाराज, शेळके महाराज, कृष्णा महाराज वाळके यांच्यासह खडकेश्वर वारकरी शिक्षण संस्था, मावळा सेवा भावी संस्था व खडकेश्वर महिला सेवाधारी मंडळातील विद्यार्थी उपस्थित होते. हार्मोनियम वादक लक्ष्मण तोडकर, नंदू बोडखे, नंदू म्हस्के, शिवाजी खोमणे, ईश्वर तोडकर, नामदेव झळके, बाळासाहेब खोमणे, संतोष थोरात, सखाराम रोकडे, बालचंद बोडखे, ज्ञानेश्वर झळके उपस्थित होते.

सप्ताह यशस्वी करण्यासाठी बापूराव वाघले, संजीवनी जयस्वाल, चंद्रकला बोडखे, सुवर्णा डोंगरे, अनिता खोमणे, नंदा खो आणि नंदा बोलखे यांनी सर्व ग्रामस्थांसह परिश्रम घेतले. सप्ताहाच्या समारोपाला जवळच्या अनेक गावातील भाविक आणि जिकठाणमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता झाली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *