वाळूजमहानगर, (ता.5) :- छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अख्ख्या देशाचे आदरणीय आहेत. त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ माफी मागावी, जनतेच्या भावनेशी खेळू नये. नसता जनता रस्त्यावर उतरेल.
असा सज्जड इशारा राज वैभव फाउंडेशनचे विक्रांत शिंदे यांनी दिला आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष देऊन दानवे यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी ही शिंदे यांनी केली आहे
