February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.20) – घराच्या पाठीमागून येऊन, पाणी पिण्याचा बहाना करत, 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला कपाशीच्या शेतात ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच घडलेल्या घटने प्रकरणी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना वडगाव (रामपुरी) येथे शनिवारी (ता.17) रोजी सायंकाळी घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वडगाव (रामपुरी) येथे राहते. शाळेत न जाणारी ही मुलगी लहान भावंडाचा सांभाळ करते. तिचे आई वडील मजुरी करतात. शनिवारी (ता.17) रोजी सायंकाळी 7 वाजता गल्लीतील एका मुलाचा हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात घरातली मंडळी जेवण करण्यासाठी गेले असताना पीडित मुलगी घरी होती. हीच संधी साधत गावातीलच आरोपी रमेश येडूबा मोरे (वय 30) हा घराच्या पाठीमागून आला. व पिण्यासाठी पाणी मागितले. पीडित 14 वर्षीय मुलीने त्याला पाणी दिले असता त्याने तिला बळजबरीने ओढत कपाशीच्या शेतात नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारीन. अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.20) आरोपी रमेश येडूबा मोरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *