March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.28) – एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच आणि पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण 6 चोरी केलेल्या दुचाकीसह दोन युवकांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतून काही दिवसापूर्वी एमएच 20, जी एम – 5395 ही 40 हजार रु किमतीची दुचाकी चोरी झाली होती. याचा पोलिस तपास करत होते. ही चोरी गेलेली ही दुचाकी आनंद सुनील बनसोडे 21 रा. जोगेश्वरी आणि अजय सुरेश चव्हाण 24 रा.टोकी बर्गीपुर ता.गंगापुर यांनी चोरल्याची शक्यता असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी चौकशीसाठी आरोपींना ताब्यात घेतले. आनंद आणि अजयची कसून चौकशी केली असता त्यांनी विकास ज्ञानेश्वर पवार रा.श्रीरामपुर याच्या साथीने दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले. शिवाय आणखी 5 दुचाकी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी करून टोकी येथील चव्हाणच्या घराजवळ लपवून ठेवल्या असल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी टोकी येथून 2 लाख 70 हजार रुपये किमतीच्या एकूण 6 दुचाकी जप्त केल्या असून आरोपी आनंद सुनिल बनसोडे व अजय विलास चव्हाण यांना अटक केली आहे. तीसरा आरोपी विकासचा शोध पोलिस घेत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त संजय सानप, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पुलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस अंमलदार जालिंदर रंधे, बाबासाहेब काकडे, सुरेश भीसे, संतोष बमनाथ, लखन घुसिंगे, सुरेश कचे, समाधान पाटील, नितिन इनामें शिवनारायण नागरे, वैभव गायकवाड यांच्या पथकाने केली .

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *