March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.15 (बातमीदार) – मकर संक्रांती निमित्त वान वसा व पूजा करण्यासाठी जाणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे गंठन चोरट्यांनी हिसकावले. यावेळी महिलांनी आरडा ओरड केल्याने काही तरुण मदतीसाठी धावले. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करत पकडलेही. मात्र चोरट्यांनी पिस्तूलचा धाक दाखवला आणि फरार झाले. ही थरारक घटना बजाजनगर येथे रविवारी (ता.15) रोजी दुपारी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पार्वती संजय पतंगे (वय 45) रा. श्री विठ्ठलकृपा सोसायटी जागृत हनुमान मंदीरजवळ बजाजनगर असे गंठन हिसकावलेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी (ता.15) रोजी पार्वती पतंगे ही महिला मकरसंक्रांत असल्याने पुजेसाठी विद्या पाटिल, शालिनी श्रीरामे, लता दवंगे या महिलांसह जात होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जागृत हनुमान मंदिराकडून (एम एच 16, जी एफ -5382) या दुचाकीवर दोन अनोळखी यांनी समोरून येऊन पार्वती पतंगे या महिलेच्या गळ्यातील 6 तोळ्यांचे राणी हार, मिनी गंठन, साधा हार चोरट्यांनी हिसकावले. यावेळी झालेल्या झटापटीत साडेचार तोळ्यांचे सोने पतंगे यांनी घट्ट धरून ठेवले. परंतु यावेळी हार तुटल्याने दिड तोळे सोन्याचे अर्धे अर्धे दागिने घेऊन आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांचासह अधिकाऱ्यांनी धाव घेतली. तर तोपर्यंत चोरटे फरार झाले होते.
पिस्तूल रोखला आणि पळाले
पार्वती पतंगे या महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र हिस्कावून दुचाकीवरून पळ काढला. यावेळी महिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे दोघांनी चोरट्यांचा पाठलाग केला. वैष्णौ देवी मंदीराजवळ चोरट्यांना तरुणांनी पकडले. दरम्यान चोरट्यांनी तरुणांवर कट्टा रोखला. आणि तेथेच दुचाकी सोडून बंद पडलेल्या कंपनीमध्ये पळ काढला. अशी आपबिती या तरुणांनी सांगितली. विशेष म्हणजे मंगळसूत्र इस्कावल्यानंतर फरार होत असलेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना त्यांचा व्हिडिओ सुध्दा काढला. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *