March 23, 2026

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे डीबी पथकाची यशस्वी कारवाई

वाळूज महानगर, (ता.4) – एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातील चार दुचाकी जप्त केल्या असून, एकूण दोन लाख दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ओअॅसीस चौकात सापळा रचून आरोपी विष्णू ज्ञानेश्वर सोनवणे (रा. गणेश हाउसिंग सोसायटी वडगाव कोल्हाटी) व शुभम शांताराम जाधव (रा. झेंडा चौक, कुंभारवाडा, वाळूज) यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली देऊन चार दुचाकी पोलिसांना काढून दिल्या. या कारवाईत वाळूज पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आरोपींना न्यायालयाच्या आदेशानुसार हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले.

यांनी केली कारवाई –

ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपआयुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, दिनेश बन, पोलीस हवालदार विलास वाघ, जालींदर रंधे, सुरेश कचे, सुरेश भिसे, पोलीस अंमलदार, नितीन इनामे, समाधान पाटील, शिवनारायण नागरे, किशोर साबळे, बाळासाहेब देवबोणे यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *