March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.9) – गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बजाजनगर, औद्योगिक क्षेत्र आणि रांजणगाव (शेपू) येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळानी जळगांव खानदेश जिल्ह्यातून व बजाजनगर येथून बोलावलेले 4 डीजे वाहने पोलिसांनी पकडले. या डीजे वाहनांची परिवहन अधिकाऱ्यांनी (RTO) तपासणी करून 1 लाख 65 हजार रुपये दंड ठोठावला.

एमआयडीसी वाळूज पोलिस व वाळूज महानगर गणेश महासंघाने गणेश उत्सवात डीजे वापरावर बंदी घातली होती. त्यामुळे शनिवारी 6 रोजी विसर्जन मिरवणूक सुरू होण्यापूर्वीच ही डीजे वाहने ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून उभी केली होती. सोमवारी 8 रोजी आरटीओ पथकाने पोलिस ठाण्यात पोहचून या वाहनांची तपासणी केली असता वाहनांच्या मुळ ढाच्यात डीजे बसविण्यासाठी बदल केल्यामुळे वाहन धारकांना दंड ठोठावण्यात आला. यानुसार पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त संजय सानप, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे , पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलिस कर्मचारी जालिंदर रंधे, लखन घुशिंगे, अमोल मनोरे आणि शिवनारायण नागरे या एम वाळूज पोलिस ठाण्याच्या यांच्या पथकाने डिजे सेट लावलेले ट्रक (एम एच 19, सी एक्स – 6473), एम एच 19, सी एक्स – 6999), (एम एच 43, वाई – 5891) आणि बजाजनगर येथील डीजे वाहन (एम एच 09, बी सी- 1671) या 4 डीजे वाहनांवर परिवहन अधिकारी (आरटीओ) शशिकांत जोगे, पूजा देवीदास कुचे आणि नितिन राठोड यांनी या चार वाहन धारकांकडून एकूण 1 लाख 65 हजार रुपये दंड ठोठावत तो वसूल केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *