वाळूज महानगर, (ता.12) : – औद्योगिक क्षेत्रात काम करतेवेळी बहुतांशी कामगार असा विचार करतात की, आम्ही इतक्या वर्षांपासून हेच काम करत आहोत, त्यामुळे सुरक्षाकडे विशेष लक्ष न देता सुरक्षा साधनांचा वापर न करता किंवा शॉर्टकट मार्ग वापरतात. सब चलता है यार! ही म्हणण्याची मानसिकता आता बदलली पाहिजे. असे प्रतिपादन वाळूज येथील इप्का लॅबोरेटरीजचे मानव संसाधन अधिकारी डॉ. व्यंकट मैलापुरे यांनी केले.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात डॉ. व्यंकट मैलापुरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सुरक्षा कर्मचारी व व्यवस्थापन सुरक्षेतेच्या बाबतीत आम्हाला सतत का सांगत असतात? असा विचार कामगार करतात तेव्हा “नजर हटी दुर्घटना घटी” अशा प्रकारचे अपघात होण्याची दाट शक्यता असते.
“गुणवत्ता पेक्षा सुरक्षा महत्वाची” त्यामुळे कामगारांनी कोणतेही काम करतेवेळी घाईगडबडीने न करता काम करण्याअगोदर त्या कामात कुठला धोका आहे का? त्याचा अगोदर विचार करुन ते काम करावे. किंवा आपले सहकर्मचारी चुकीचे काम करत असल्यास त्यास तात्काळ पायबंद करावे, आणि व्यवस्थापनाच्या नजरेस आणून द्यावे. ज्यामुळे संभाव्य अपघात होण्याअगोदर टाळता येईल. धोका आपल्या भोवती आपल्या सोबत सावली प्रमाणे आपला पाठलाग करत असतो. त्यामुळे सुरक्षा ही कंपनी पुरती मर्यादित ठेवू नये. धोका टाळण्यासाठी कामगाराने सतर्क व जागरूक असले पाहिजे. असे अवाहन डॉ. व्यंकट मैलापूर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक सुरक्षा विभागाचे संभाजीनगरचे सह संचालक राम दहिफळे हे उपस्थित होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी त्यांनी सुरक्षरेचे व कर्मचाऱ्यांना अपघात कमी करण्यासाठी सुरक्षित ऑपरेटिंग पद्धतीचे काटेकोरपणे पालन केले तर भविष्यात होणारे धोके कमी होतील. असे मार्गदर्शनातून संबोधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिनाथ सुरवसे यांनी तर आकाश पुंड यांनी आभार मानले. यावेळी रमेश बिरादार, महेंद्र चौधरी, परवेज खान, मधुकर गीते, एकनाथ पवार, प्रफुल्ल कांबळे, संतोष कोटकर, वसंत कपाटे, बबन काळे आदींची उपस्थिती होती.
