March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.14) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, श्री गजानन ज्युनिअर कॉलेज व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती भव्य रॅली काढून उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आय.जी. जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, सचिव हरीश जाधव, प्रमुख पाहुणे कवी पोद्दार सर, माध्यमिक मुख्याध्यापक मष्णाजी शिनगारे, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, कल्याण कुलकर्णी, मनीषा नवथर, प्रा संजय तुपे, भाऊसाहेब शिरसाट, रेखा बिदरकर, हनुमंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेतून राजमाता जिजाऊ साहेबांची घोड्यावर विराजमान असलेल्या ज्वलंत प्रतिकृतीचे परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली काढण्यात आली. या रॅलीत ढोल, झांज, लेझीम पथकाचे प्रात्यक्षिके करण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून भव्य रॅलीस समारोप झाला.

रॅलीत सहभागी विद्यार्थी, महिला पालक राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत फेटेसहित उपस्थित राहून रॅलीची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गायन, पोवाडे आणि मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक तारडे, संदीप हिंगणकर, गुलाब मोहिते, परमेश्वर गीते, विशाल जाधव, सौरभ लगड, सुनील शिंदे, उल्हास वाघ, संभाजी जाधव, अश्विनी सूर्यवंशी, स्वाती सूर्यवंशी, छाया वागदरे, विजया पवार, सोनी शुक्ला, पूजा ठाकूर, ममता खोतकर, पूजा खोतकर, सुरेखा शिंदे, सुभाष जाधव, पूजा गिरी, डी.जी.कोळी, प्रवीण पाईकराव, जब्बार पठाण, विनय अवसरमोल, प्रल्हाद मंगनाळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *