March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.18) – धारदार तलवार बाळगणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणास वाळुज एमआयडीसी पोलीस आणि घाणेगाव येथून गुरुवारी (ता.16) रोजी जेरबंद करुन त्याच्या ताब्यातुन तलवार जप्त केली.
आदर्श संदीपान हिवाळे (24, रा.संघर्षनगर, घाणेगाव) याच्याजवळ धारदार तलवार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहिती वरून पोलीस पथकाने गुरुवारी (ता.16) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आदर्श हिवाळे याच्या घरी छापा मारुन त्याने लपवून ठेवलेली धारदार तलवार जप्त केली. या प्रकरणी पोहेकॉ.विनोद नितनवरे यांच्या फियार्दीवरुन आरोपी आदर्श हिवाळे याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *