
वाळुज महानगर, (ता.28) – लहान मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी दोघांनी महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणे बुधवारी (ता.27) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील पंचगंगा हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या एक महिलेचे दोन्ही मुले हे घरासमोरील गल्लीत खेळत होते. त्यावेळी या मुलाचे व पवार यांच्या मुलासोबत भांडण झाले. त्यामुळे फिर्यादी महिला गणेश पवार यांना समजावुन सांगुन परत घरी आल्यानंतर गणेश पवार हा शिवीगीळ करत तिच्या घरात आला व तुझ्या मुलाने माझ्या मुलासोबत भांडण का केले. असे म्हणुन महिलेचा उजवा हात जोरात ओढला व हात मुरगळला. त्याने महिलेचा पंजाबी ड्रेस ओढल्याने तो फाटला. त्यामुळे तिच्या मनास लज्जा निर्माण झाली. त्यानंतर गणेश पवार याने फिर्यादी यांना घराचे बाहेर ओढत नेऊन हाताचापटाने मारहाण केली. त्यानंतर आरोपी रेखा पवार या तेथे आल्या व त्यांनी देखील शिवीगाळ करुन महिलेच्या डोक्यावरील केस ओढुन हाताचापटाने मारहाण केली. तसेच जर पोलीसात तक्रार दिली तर मी स्वतःला मारुन घेईल. अशी धमकी दिली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गणेश पवार व रेखा पवार यांच्याविरुद्ध कलम 354, 452, 323, 504, 506, 34 भादंविप्रमाणे बुधवारी (ता.27) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करीत आहे.
