March 25, 2026


वाळूजमहानगर, (ता.15) – एका 45 वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पंढरपुर येथे सोमवारी (ता.15) रोजी सकाळी 9.40 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपुर येथील सलामपुरेनगर येथे राहणाऱ्या अनिल रामभाऊ मोकळे (45) याने सोमवारी (ता.15) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास राहत्या घरी पत्र्याच्या लाकडी बल्लीला साडीच्या सहयाने गळफास घेतला. त्याला बेशुद्ध अवस्थेत सागर बनकर, अमोल खरात यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासुन त्याला मृत घोषीत केले. मात्र त्याने आत्महत्या कशामुळे केली. हे समजू शकले नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोह किशोर घुसळे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *