वाळूजमहानगर (ता.20) – किरायाच्या घरातील छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन 24 वर्षीय तरूणाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.19) रोजी दुपारी रांजणगाव (शेणपूंजी) येथे घडली. आत्महत्येचे कारण मात्र समोर आले नाही.
बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्तनगर परिसरातील किरायाच्या एका घरात अजय विरेंद्र प्रसाद (वय 24) राहत होता. या तरूणाने रविवारी (ता.19) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरातील छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. बेशुद्ध अवस्थेत त्याला संजू कमलदेव मोर्य आणि अभिषेक शेषराव चव्हाण या दोघांनी घाटीत दाखल केले. मात्र तेथील डाॅक्टर तपासून अजय याला मृत घोषित केले. मात्र त्याने आत्महत्या केल्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी ए आर खिल्लारे यांनी घाटीतून दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस हवालदार वाडेकर हे प्रकरणाचा तपास करीत आहेत.
