February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.8) – गरुड झेप अकॅडमीच्या चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी व आई-वडिलांचा सत्कार बुधवारी (ता.7) रोजी वीर सावरकर मैदान महाराणा प्रताप चौक बजाजनगर येथे मोठ्या उत्साहात झाला.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गरुड झेप अकॅडमी च्या 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात विविध पदावर निवड झाली असून यावेळी यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार गरुड झेप अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, संस्थेचे संस्थापक प्रा डॉ सुरेश सोनवणे, संचालक निलेश सोनवणे यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप गुरमे म्हणाले की, शाळा व शिक्षक कितीही चांगले असले तरी विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असेल तरच यश मिळते. अन्यथा अपयश मिळणे सहाजिकच आहे. स्पर्धा परीक्षेत असंख्य स्पर्धक भाग घेतात. परंतु यशस्वी तोच होतो जो जिद्द चिकाटी व सकारात्मक विचार मनाशी बाळगून समोर जातो. त्यामुळे अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्यापेक्षा योग्य वेळी योग्य नियोजन करून अभ्यास करा. यश हमखास मिळेल. याप्रसंगी प्रा डॉ एस एस सोनवण यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी गुरु मंत्र दिला. तसेच निलेश सोनवणे यांनी प्रस्तावना करत आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. साळवे यांनी सूत्रसंचालन तर प्रा राठोड यांनी आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *