March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.11) -सिडको वाळूज महानगर -1 येथील राजनगर गट नंबर 166 मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सुनंदा शहाणे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथकाच्या लता जाधव, सुनंदा लोंढे, प्राध्यापक उमाकांत राठोड उपस्थित होते.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून मार्गदर्शनपर भाषणे केली. रुक्मिणी शिंदे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना वाढवणे व पल्लवी सहाने यांनी केले. कार्यक्रमानिमित्त महिला दिनाची रांगोळी काढून कार्यक्रमात रंगत वाढवली. वैशाली गायके, छाया चव्हाण, वंदना बोरुडे, शारदा डाके, शिल्पा भुताळे, शारदा जाधव, कांचन जाधव, प्रांजल महाजन, सुवर्णा सर्वदे यांच्यासह राजनगरमधील अनेक महिलांनी या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी मंगल आष्टीकर, पुनम पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी रुक्मिणी शिंदे यांनी आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *