वाळूजमहानगर, (ता.27) – नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांना चुकीच्या पद्धतीने निलंबित करण्यात आले होते. त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे. या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निर्देशने करण्यात आले व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी उपस्थित युवा नेते संतोष भाऊ माने, विजय वरकड, तोगे नाना, शाम भाऊ धूत, वाल्मीक शिरसाठ, अहमद पटेल, सुरेश नेमाडे, ज्ञानेश्वर साबणे, रफिक पटेल, गुलाम शाह, अकतर सय्यद, अनंता कुमावत, दिनेश गायकवाड, टीले आबा, कैलास खाजेकर, सागर शिंदे, पृथ्वीराज तोगे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
