March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.22)- बेंगलोरहून प्रवासी घेऊन नाशिककडे गंगापूर मार्गे जाणारी खाजगी ट्रॅव्हल बस गंगापूर पासून काही अंतरावर पलटी झाली. हा अपघात गुरुवारी (ता.20) रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास गंगापूर वैजापूर रोडवर झाला.

याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती अशी की, आनंद ट्रॅव्हलची खाजगी बस (जी ए 08, व्ही -6124) ही बेंगलोरहून छत्रपती संभाजीनगर, गंगापूर मार्गे नाशिकला जात होती. गंगापूर सोडल्यानंतर गुरुवारी (ता.22) सकाळी सहा वाजेच्या सुमारास समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाने बसला हुल दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात ट्रॅव्हल बस रोडच्या खाली जाऊन पलटी झाली. बस मध्ये जवळजवळ 25 प्रवासी होते. ही बस डाव्या बाजूने उलटल्याने बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे बसच्या छतावरील व्हेंटिलेटर मधून प्रवासी बाहेर काढण्यात आले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *