
वाळूजमहानगर, ता.11 – वेरूळ खुलताबाद हे जागतिक पर्यटन स्थळ असून देखील सुविधा अभावी पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ कसे असावेत सुविधा कश्या असाव्या रोजगार निर्मिती कशी होईल याचे पूर्णपणे नियोजन मी केले आहे. फक्त मला पुढील पाच वर्ष आमदारकीची संधी द्या. असे आवाहन अपक्ष उमेदवारी डॉ सुरेश सोनवणे मतदारांनी मतदारांना केले.

गंगापूर विधानसभा मतदारसंघात मी भूमिपुत्र विजय अभियानादरम्यान खुलताबाद तालुक्यातील सराई,भडजी, गोळेगाव, गदाना, सुलतानपूर, वडोद सोनखेडा, काटशेवरी फाटा, रसूलपुरा, शंकरपूर वाडी, घोडेगाव, खिर्डी, सालुखेडा या गावांना अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी मतदारांची संवाद साधला. यावेळी वेरूळ कैलास लेणी जगप्रसिद्ध आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून भद्रा मारुती देवस्थान देखील खुलताबाद तालुक्यात आहे. परंतु राजकीय मंडळींच्या संकुचित मनोवृत्तीमुळे विकास रखडला आहे. या पर्यटन स्थळांना जागतिक दर्जा असून देखील सुविधा अभावी पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. आगामी काळात पाच वर्ष मला मतदान रुपी आशीर्वाद द्या. व पान्हा या चिन्हा समोरील बटन दाबा, आगामी पाच वर्षांमध्ये पर्यटन स्थळातील सुखसुविधा यासह रोजगार निर्मितीवर भर देऊन तालुक्यातील तरुणांना यामध्ये प्राधान्य दिले जाईल. असे आवाहन अपक्ष उमेदवार डॉ सुरेश सोनवणे यांनी यावेळी मतदारांना केले.

याप्रसंगी अमोल दहिभाते, अजय जाधव, संजय अधाने, राजू तुपे, नवीन पठाण, अलीम पठाण, अनिल सुर्वे, स्वप्निल चव्हाण, चिंतामणी संगवे, अनिल चव्हाण, बाळू गायकवाड, अजय वाघमारे, कृष्णा अधाने, रमेश अधाने, शंकर अधाने, कलीम पटेल, गणेश वाकळे आदी सह नागरिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
