वाळूज महानगर – वाळूज परिसरातील करोडी ते लासुर स्टेशन दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निष्क्रिय प्रशासन व आमदार प्रशांत बंब यांच्या विरुद्ध रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून अनोखे आंदोलन शनिवारी (ता.24) सप्टेंबर रोजी करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देत राष्ट्रवादीने प्रशासन व आमदार बंब यांचे वाभाडे काढले.
मुंबई ते नागपूर हा एक्सप्रेस वे वाळूज परिसरातून गेला आहे. या एक्सप्रेस वे वरील करोडी फाटा ते लासूर स्टेशन या 23 किमीटरच्या रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामध्ये वाहन आदळून अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी या अपघातामध्ये काहीना जीव गमवावा लागला तर अनेकांना अपंगत्व आले आहे. तरिही प्रशासन व स्थानिक आमदार यांना जनतेचे काहीही घेणे देणे राहिले नाही. असे ते वागत आहे. त्यामुळे प्रशासन व आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत संघटना यांच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून शनिवारी (ता.24) सप्टेंबर रोजी आसेगाव फाटा, ता. गंगापूर येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. यात प्रशासनासह स्थानिक आमदारांचे चांगलेच वाभाडे काढण्यात आले.
यांनी केले आंदोलन –
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे युवा नेते संतोषभाऊ माने, शिवाजीदादा बनकर, नंदु सोनवणे, सुभाष बनकर, समाधान गायकवाड, भाऊसाहेब गवळी, उध्दव खोमणे, रोशन पंडित, विष्णु मुळे, चंद्रकांत चव्हाण, अशोक गायकवाड, शंकर प्रधान, संदीप थोरात, मनोज जाधव, केदार जाधव, युणुस शेख, प्ररवेज पठाण, राधाकिसण थोरात, सुभाष वाघले, नारायण बनकर, बाळू काळे, अनिल मते, सुनिल पाखरे, पाडुरंग कापसे, राहुल नरोडे, कृष्णा कोकणे, राम वाकले, राहुल नरोडे, सुनिल करपे, चरणशिंग जारवाल, हरिचंद पर्हाड, प्रतीक लिंगायत, राजु जाधव, सचिन थोरात व इतर पदाधिकारी व पंचक्रोशितील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठ दिवसाची मुदत –
यावेळी नाईचे अधिकारी कुलकर्णी यांना निवेदन देण्यात येऊन आठ दिवसाच्या आत काम सुरू करा, नाहीतर रस्ता रोको करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. त्यावर कुलकर्णी यांनी आश्वासित केले की, आठ दिवसाच्या आत रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.
