March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.9) – जुन्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन दोन भावाला शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहाण करून लोखंडी कोयत्याने मारून एकाच्या डाव्या हाताचे बोट तोडले. ही घटना शनिवारी (ता.13) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील पंढरपूर येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सतिष अशोक भालेराव वय-27, रा. नक्षत्रवाडी ता.जि. छत्रपती संभाजीनगर व त्याचा लहान भाऊ संतोष असे दोघे शनिवारी (ता.13) रोजी वाळूज औद्योगिक वसाहतीत काम शोधत होते. दिवसभर काम शोधल्यानंतर हे दोघे घरी जाण्यासाठी पंढरपूर येथील तिरंगा चौकात रात्री 10 वाजेच्या सुमारास आले. त्याचवेळी त्यांना ओळखीचा कुणाल नवतुरे भेटला. त्याने जुन्या भांडण्याच्या कारणावरुन दोन्ही भावास शिवीगाळ करु लागला. त्यास समजावित असताना त्याने हाताचापटाने मारहाण केली. व त्याचे जवळील लोखंडी कोयत्याने सतीश याच्या हाताचे अंगठ्या जवळील बोट तोडले. या प्रकरणी सतीश भालेराव यांच्या फिर्यादीवरून आरोपी कुणाला नवतुरे याच्या विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *