March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.3 – तुम्ही दारू पिऊ नका, वेळेवर दुकान बंद करून घरी येत जा. दुकानावरच आपली उपजीविका आहे. असे समजावून सांगणाऱ्या पत्नीला खाली पाडून तिच्या गळ्यावर कैचीने सपासप वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बजाजनगर येथे बुधवारी (ता.2) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर पती फरार झाला असून जखमी पत्नीवर उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बदनापुर जि. जालना येथील कोमल हीचे लग्न 2017 मध्ये ऋषीकेश भिकाजी खैरे रा. सोमनाथ, जळगाव जि. जालना यांच्यासोबत झाले आहे. तिला आरोही नावाची (वय 5) एक मुलगी आहे. मुलगी व दोघे पती पत्नी बजाजनगर येथे भाड्याने राहतात. ऋषीकेश हा किराणा दुकाण चालवतो. तो मागील काही महीण्यापासुन दारु पित होता. त्यामुळे दुकान जास्त वेळ बंद राहत होते. दारू पिऊ नका, दुकाण व्यवस्थित चालवुन तुम्ही वेळेवर घरी येत जा. असे कोमल त्याला समजावून सांगत होती. मात्र मी कमावतो, मला वाटेल तसे मी वागेल, मला कोणाची पर्वा नाही, तु मला शिकतेस का, तुला याचे गंभीर परीणाम भोगायला लावतो. अशा धमक्या देवुन तो तिचे काहीही ऐकत नव्हता.

बुधवारी (ता.2) रोजी सकाळी कोमल व पती ऋषीकेश यांच्यात वाद झाल्याने ऋषिकेश याने कोमलच्या गळ्यावर कैचीने सपासप वार करून जिवे मारण्याच प्रयत्न केला. त्यावेळी घरातून ओरड्याचा आवाज आल्याने शेजारी राहणारे गंगा बेवले, अंजली गायकवाड आदीनी खैरे यांच्या घरी धाव घेत कोमलला ऋषिकेश याच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर तीला उपचारार्थ खाजगी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान आरोपी पती ऋषीकेश खैरे हा फरार झाला असून या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कोमल खैरे हिच्यावर बजाजनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी कोमलचा भाऊ सचिन खरात रा. नारेगाव याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घातपाताची शक्यता होतीच –
गेल्या काही दिवसांपासुन तो बारीक सारीक कारणावरुन विनाकारण शिवीगाळ करुन कोमल हिला मारहाण व जीवे मारण्याची धमकी देत होता. मार्च रोजी कोमल ही नारेगाव येथे भावाच्या घरी आली होती. तीच्या सोबत पतीही होता. त्यावेळी तिने तिच्या त्रासाबाबत माहिती सांगितल्याने त्यांनी ऋषिकेशला समजावुन सांगीतले होते. परंतु त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. त्यावरून तो नक्कीच बहीणीचा काहीतरी घातपात करु शकतो असे वाटत असल्याने पतीपासून सावध राहण्यास बहिणीला सांगीतले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *