March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.17)- केंद्रीय वॉश पथकाच्या वतीने वाळूज परिसरातील साजापूर गावाला भेट देऊन स्वच्छता अभियान व जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेची शुक्रवारी (ता.16) रोजी माहीती घेतली.


या केंद्रीय पथकात हरियाणा राज्य येथील मुख्य अभियंता देवेंद्रसिंह बाजवा, आसाराम राज्य येथील मुख्य अभियंता सरोबजी सैकिया यांचा समावेश होता. या पथकाने साजापूर गावास भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत त्यांनी स्वच्छता अभियान व जलजीवन मिशन अंतर्गत साजापूर येथे राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजना या विषयी माहीती घेण्यात आली.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने पाणी पुरवठा विभागाचे उप विभागीय अभियंता सुनिल खंदारे, साजापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी प्रकाश पाटील तुपे, तालुका समन्वयक प्रसाद भुईगळ, स्वच्छता तज्ञ वैशाली जगताप, पाणी गुणवता समन्वयक अलका पवार यानी त्यांना संपूर्ण माहीती दिली. याप्रसंगी सरपंच जनार्धन बनसोडे, उपसरपंच कैसर ईस्माईल, माजी जिल्हा परिषद सदस्य सय्यद कलीम, ग्रामपंचायत सदस्य हाशम पटेल, आशाबाई गाडेकर, किरण गंगावणे, इब्राहिम शेख, ग्रामपंचायत कर्मचारी व गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *