वाळूजमहानगर, ता.2 – हॉटेलवर उभ्या असलेल्या तरुणाच्या हातातील पाण्याची बाटली घेतल्याने झालेल्या वादातून दोन जणांनी शिवीगाळ करत हाताचापटाने, लाकडी दांडाने व फायटरने मारहाण करून मारहाण केले. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास जोगेश्वरी येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फॅब्रिकेशनचा धंदा करणाऱ्या अफजल शेख सरदार (वय-35), रा. चादणी चौक, जोगेश्वरी ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर हा 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास रामहरीच्या हॉटेलवर गायछाप पुडी व पाणी बाँटल घेण्यासाठी गेला होता. तेथे सागर काबरा, संदीप काजळे रा. जोगेश्वरी व ईतर दोन (पत्तापुर्ण नाव पत्ता माही नाही) त्यांनी अफजल याच्या हातातील पाण्याची बॉटल घेतली. त्यांना पाण्याची बाँटल का घेतली असे विचारले असता त्यांनी शिवीगाळ करून लाकडी दांड्याने, फायटरने डोक्यात मारुन जखमी केले. त्यावेळी फजलचा भाऊ सिकंदर सरदार शेख हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याला सुद्धा मारहान केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
