February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.27) – ग्रोथ सेंटर, सिडको वाळूज महानगर येथील किड्स केम्ब्रिज स्कूल मध्ये संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, श्रद्धा म्हस्के यांच्या उपस्थितीत ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सर्व विद्यार्थी लाल रंगाचे ड्रेस आणि छान अशी सांताक्लोजची टोपी घालून आले होते. सर्व मुलांना आवडणारा असा सांताक्लॉज आल्यावर मुलांनी एकच जल्लोष केला. सांताक्लॉजने मुलांसोबत डान्स केला, त्यांना चॉकलेट्स दिले. यावेळी येशू ख्रिस्त यांचा जन्माचा देखावा सादर करण्यात आला होता. मदर मेरीच्या वेशात आठवी वर्गातील कार्तिकी चव्हाण तर फादर जोसेफच्या वेशात यश शेळके हे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये नर्सरी ते चौथीच्या वर्गातील मुलींनी जिंगल बेल गाण्यावर उत्कृष्ट डान्स सादर केला. शिक्षिका रुपाली उपलकर यांनी ख्रिसमस सणा बद्दल माहिती सांगितली. यावेळी सोनाली कुलकर्णी, मधुश्री डाके, रुपाली उपलकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, सुवर्णा जोशी, वीणा कन्नावार, सुवर्णा कदम, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार, अर्चना जगताप, सरिता डावखर, राणी कांबळे, सरला रोडगे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *