March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.15) -सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये ” राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद” यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ साकारून लक्ष वेधले होते. कार्यक्रमास संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, श्रद्धा म्हस्के उपस्थित होत्या.

यावेळी बाल वर्गातील विद्यार्थिनी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत तर विद्यार्थी स्वामी विवेकानंद यांच्या वेशात उपस्थित होते. सातवीच्या वर्गामधून विनय कास्तोडे आणि पवन यशवंत या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंचा पोवाडा अतिशय उस्फुर्तपूर्व सादर केला. तर काही विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंचा पाळणा प्रस्तुत केला. त्यानंतर जिजाऊशी निगडित नाट्य सादर करण्यात आले. त्या मधून जिजाऊंची लोकांबद्दल न्याय व्यवस्था आणि स्त्री-सन्मान दर्शविण्यात आला. काही विद्यार्थांनी स्वामी विवेकानंद यांच्या विषयी भाषणे दिली. शिक्षिका सुवर्णा कदम यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विषयी मुलांना विशेष माहिती सांगितली. शेवटी राजमाता जिजाऊ याना वंदना अर्पण करून सातवी वर्गाच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम झाला. यावेळी वीणा कन्नवार, रुपाली चौधरी, मधूश्री डाके, सोनाली कुलकर्णी, रुपाली उपळकर, सुवर्णा जोशी, सरिता डावखर, मोनिका चतुर्भुज, अर्चना जगताप, मयुरी पवार, राणी कांबळे, कुणाल शिंदे, सरला रोडगे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *