वाळुज महानगर, (ता 14) :- सिडको ग्रोथ सेंटर, सिडको वाळूज महानगर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये पदवी प्रधान सोहळा मोठ्या उत्साहात झाला. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, निलेश म्हस्के, श्रद्धा म्हस्के उपस्थिती होती. 
यावेळी सिनिअर केजी च्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व विद्यार्थी सिनिअर केजी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात प्रवेश करण्यासाठी पात्र झाले. यावेळी विद्यार्थाना पदवी प्रमाणपत्रासह पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. काही विद्यार्थांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, पालकांचाही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षिका रुपाली उपलकर यांनी सूत्र संचालन केले. तर सोनाली कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी मधूश्री डाके, सुवर्णा जोशी, वीणा कन्नवार, सुवर्णा कदम, सरिता डावखर, मोनिका चतुर्भुज, अर्चना जगताप, राणी कांबळे, सरला रोडगे, कुणाल शिंदे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.
