March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.13)- अंकुर शिक्षण संस्था संचालित ग्रोथ सेंटर सिडको, वाळूजमहानगर येथील किड्स कॅम्ब्रिज स्कूल मध्ये “डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ” साजरी करण्यात आली. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील, श्रद्धा म्हस्के उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. त्यांच्या सर्व कार्याबद्दल शिक्षिका अर्चना जगताप यांनी माहिती दिली. मोठ्या वर्गातील विद्यार्थिनींनी बाबासाहेब यांच्या कार्याबद्दल भाषणे दिली. यावेळी शिक्षिका मधुश्री डाके, सोनाली कुलकर्णी, रुपाली उपलकर, वंदना कदम, सुवर्णा जोशी, वीणा कन्नावार, सुवर्णा कदम, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार, सरला रोडगे, राणी कांबळे, कुणाल शिंदे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *