March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.3) – अंकुर शिक्षण संस्था संचालित ग्रोथ सेंटर सिडको वाळूज महानगर येथील किड्स कॅम्ब्रिज स्कूल मध्ये अखंडित 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षी देखील विद्यार्थांनी कायम ठेवली. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्कृष्ट यश मिळवले.


सर्व दहावीचे विद्यार्थी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो दहावीचा निकाल दोन जून रोजी जाहीर झाला. त्यामध्ये सिडको वाळूजमहानगर येथील किड्स कॅम्ब्रिज स्कूल चा 100 टक्के निकाल लागला यामध्ये तनिषा साळवे – 89.40 टक्के, मेघा हांडे – 85.40 टक्के, श्वेता बचुटे – 84.60टक्के, शुभम तांबे – 81 टक्के, वेदांत साळुंखे – 80 टक्के, सुवर्णा कांबळे- 79.40 टक्के, दिशा जाधव – 78.20 टक्के, अंजली उगले – 78 टक्के, सना सय्यद – 71 टक्के, ललिता चौधरी – 70.80 टक्के, प्रेम गुडदे – 68.40 टक्के, वैभव पारखे – 67.20 टक्के, नितीन झळके – 66.80 टक्के, सार्थक खोबरे- 66 टक्के, स्नेहल सलामपुरे – 65.80 टक्के, चंद्रहार ताराईयावले – 60.40 टक्के. या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले. सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्ष गोविंद गोंडे पाटील, संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील, श्रद्धा म्हस्के यांनी केले. व पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षेकतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *